श्री. देवेंद्र फडणवीस
माननीय मुख्यमंत्री
सुसज्ज पायाभूत सुविधांद्वारे संपर्क वाढविणे आणि संशोधन व नवोपक्रम संस्कृतीला प्रोत्साहन देणे ही समावेशक औद्योगिक प्रगतीची दिशा ठरते.
श्री. एकनाथ शिंदे
माननीय उपमुख्यमंत्री
महाराष्ट्रातील सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (MSME) क्षेत्र हे भारताच्या आर्थिक प्रगतीचे महत्त्वाचे प्रेरक घटक आहे. उत्पादकतेत वाढ करून व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत, समान संधींच्या प्रोत्साहनाचे हे मूर्त रूप आहे.
श्री. अजित पवार
माननीय उपमुख्यमंत्री
उद्योग कोणताही असो, मोठा किंवा लहान त्याचा कणा म्हणजे वित्तव्यवस्था होय. सक्षम वित्तीय व बँकिंग क्षेत्र उभारल्यास महाराष्ट्राचे रूपांतर जगातील वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एकामध्ये करण्यास चालना मिळेल.
डॉ. उदय सामंत
माननीय उद्योग मंत्री
उद्योग, नवोपक्रम आणि शाश्वत पायाभूत सुविधा यांवर लक्ष केंद्रित करून महाराष्ट्र इंडस्ट्री ४.० तंत्रज्ञानावर आधारित नव्या तांत्रिक क्रांतीकडे वेगाने वाटचाल करीत आहे.
श्री इंद्रनील नाईक
माननीय उद्योग राज्यमंत्री
औद्योगिक वाढ ही समृद्धीला चालना देणारी, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (MSME) तसेच स्थानिक उद्योजकांना सक्षम करणारी आणि महाराष्ट्रातील सर्वच प्रदेशांमध्ये संधी उपलब्ध करून देणारी असावी. उद्योग-हितैषी धोरणे आणि मैत्री (MAITRI) मार्फत गुंतवणूकदारांच्या तक्रारींचे सक्रीय निराकरण यामुळे महाराष्ट्राने देशातील सर्वात व्यवसायसुलभ गंतव्यस्थान म्हणून आपली ओळख अधिक दृढ केली आहे. न्याय्य व भविष्यकालीन विकास हा केंद्रबिंदू ठेवून महाराष्ट्राला देशातील अग्रगण्य उद्योग व गुंतवणूक केंद्र म्हणून कायम ठेवण्यास आम्ही वचनबद्ध आहोत.
श्री. पी. वेलरासू
आय ए एस, मुख्य कार्यकारी अधिकारी, एमआयडीसी
देशाच्या अर्थव्यवस्थेत, औद्योगिक विकासात, निर्यातीत आणि थेट परकीय गुंतवणुकीच्या (FDI) आकर्षणात सर्वाधिक योगदान देण्याचा आम्हाला अभिमान आहे. महाराष्ट्राच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.
















