भूखंड वाटपानंतर इमारतीच्या बांधकामासाठी ही सेवा आवश्यक आहे.
आपल्या भूखंडतील सांडपाण्याचा प्रवाह महामंडळाच्या सांडपाणी प्रक्रिया केंद्रापर्यंत जोडण्यासाठी ही सेवा आवश्यक आहे.
कोणत्याही सेवा लागू होण्यासाठी कुठलीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. ते फक्त कार्यालयीन वापरासाठी आहे. ते पाणी देयक जारी करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यामार्फत दिले जाते. हे प्रमाणित करते की भूखंड धारकाकडे थकित पाणी, अग्निशमन आणि सेवा शुल्काची थकबाकी नाही. (या प्रमाणपत्राचा वापर महामंडळाबाहेर करू नये).
एसडब्ल्यूसीकडे अर्ज सादर केल्याच्या दिनांकापासून 7 दिवसांच्या आत थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र दिले जाईल. एसडब्ल्यूसीकडे अर्ज सादर केल्याच्या दिनांकापासून 7 दिवसांच्या आत थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र दिले जाईल.
कोणतेही शुल्क लागू नाही.
हे थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र पुढील महिन्याचे पाण्याचे देयक जारी होईपर्यंत वैध असेल.
औद्योगिक क्षेत्रातील भूखंडाकरीता किलोवॅट (Kwh) च्या वीज जोडणी मंजूरीकरीता ही सेवा आवश्यक आहे. .
पाणी देयके , सर्व्हिस देयके आणि ग्रामपंचायत कर पावती ग्राहक सेवा संकेतस्थळांवर उपलब्ध आहेत. कृपया ग्राहक सेवा संकेतस्थळांवर रजिस्टर करा आणि या सेवांचा लाभ घ्या. देयके व पावती सोबतच मागील १२ महिन्यांची माहितीही उपलब्ध आहे आणि सोबत बरेच काही