अस्वीकरण

या पोर्टलवरील माहिती व मजकूर काळजीपूर्वक उपलब्ध करून देण्यात आला असला तरीही या माहितीचा वापर आणि तिच्या वापरामुळे उद्भवणाऱ्या परिणामांची जबाबदारी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ स्वीकारत नाही. कोणतीही विसंगती/ संभ्रम असल्यास, अधिक स्पष्टीकरणासाठी वापरकर्त्याने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या संबंधित अधिकाऱ्याशी संपर्क साधावा.

हायपर लिंकिंग विषयीची धोरण

बाह्य संकेतस्थळे/ पोर्टलशी जोडणी (लिंक्स)

या पोर्टलवर अनेक ठिकाणी आपल्याला अन्य शासकीय, अशासकीय/ खाजगी संस्थाकडून निर्माण केलेल्या व त्यांच्या देखभालीत असणाऱ्या अन्य संकेतस्थळांच्या / पोर्टलच्या जोडण्या आढळून येतील. या जोडण्या तुमच्या सुविधेसाठी तेथे उपलब्ध करून दिलेल्या आहेत. जेव्हा तुम्ही एखाद्या जोडणीची निवड कराल तेव्हा तुम्हाला त्या बाह्य संकेतस्थळावर नेले जाईल. एकदा तुम्ही त्या संकेतस्थळावर गेल्यावर, तुम्ही त्या संकेतस्थळाचे प्रायोजक/ मालक यांच्या गोपनीयता व सुरक्षितता धोरणांच्या अधीन रहाल. अशा जोडणी असलेल्या संकेतस्थळांवरील माहिती व त्यांची विश्वासार्हता यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (मऔविम) जबाबदार असणार नाही आणि त्यामध्ये मांडलेल्या मतांना आम्ही समर्थन करत नाही. केवळ जोडणीच्या उपलब्धतेमुळे किंवा या पोर्टलवरील त्यांच्या सूचीकरणामुळे त्यांना आमचे कोणत्याही प्रकारचे समर्थन असल्याचे गृहीत धरता येणार नाही.

अन्य संकेतस्थळांद्वारे / पोर्टल्सद्वारे आमच्या पोर्टलशी लिंक्स

आमच्या संकेतस्थळावरील माहितीसोबत तुम्ही थेट जोडले जाण्याला (लिंकिंग) आमचा कोणताही आक्षेप नाही आणि त्यासाठी पूर्व परवानगीची आवश्यकता नाही. मात्र तुमच्या संकेतस्थळावरील चौकटींमध्ये आमची पृष्ठे दाखवण्याची (लोडिंगसाठी) परवानगी आम्ही देत नाही. आमची पृष्ठे वापरकर्त्याच्या नवीन उघडलेल्या ब्राउजर विंडोमध्येच उघडणे बंधनकारक आहे.

अटी व शर्ती

या पोर्टलची संरचना, विकसन आणि देखभाल महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाद्वारे (यापुढे मऔविम) करण्यात येते. या पोर्टलसाठीचा मजकूर मऔविमकडून पुरवण्यात आला आहे आणि या पोर्टलवर प्रवेश केल्यावर (या पोर्टलचा वापर करताना) तुम्ही अटी व शर्तींशी कायदेशीर बांधीलकी बिनशर्त मान्य केल्याचे गृहीत धरण्यात येईल. जर नमूद केलेल्या अटी व शर्ती तुम्हाला मान्य नसतील तर कृपया तुम्ही पोर्टलवर प्रवेश करू नका. या पोर्टलवरील मजकूर अचूक व अद्ययावत असेल याची खात्री करण्यासाठी सर्वतोपरी खबरदारी घेण्यात आली आहे; तथापि, कायद्याचे विधान म्हणून त्याचा अर्थ काढता येणार नाही किंवा कोणत्याही कायदेशीर हेतूकरिता उपयोग करता येणार नाही. काही संदिग्धता किंवा शंका असल्यास, वापरकर्त्यांना सल्ला आहे की त्यांनी अन्य स्त्रोताशी/ स्त्रोतांशी पडताळून/ तपासून पाहावे आणि योग्य कायदेशीर सल्ला घ्यावा. कोणत्याही मुदत व मर्यादा याशिवाय, अप्रत्यक्ष किंवा परिणामी हानी अथवा नुकसान अथवा कोणतेही खर्च, वापरामुळे, किंवा वापर न केल्यामुळे, माहितीचा वापर न केल्यामुळे, या संकेतस्थळाचा वापर करण्यासंबंधात किंवा वापर केल्यामुळे उद्भवणारे कोणत्याही प्रकारची हानी अथवा नुकसान यासह कोणत्याही प्रकारचा खर्च, तोटा, दुष्परिणाम अथवा हानी झाल्यास कोणत्याही परिस्थितीत मऔविम जबाबदार राहणार नाही. या अटी व शर्ती भारतीय कायद्यांच्या नियंत्रणात अथवा  त्याअनुषंगाने आहेत. या अटी व शर्तींअंतर्गत उद्भवणारे कोणतेही विवाद भारतीय न्यायालयांच्या अधिकारकक्षेच्या अधीन आहेत.

 गोपनीयता धोरण

एक सर्वसाधारण नियम म्हणून, हे पोर्टल स्वयंचलितरित्या तुमची व्यक्तिगत ओळख स्पष्ट करणारी कोणतीही विशिष्ट अशी वैयक्तिक माहिती (जसे की तुमचे नाव, दूरध्वनी क्रमांक किंवा इमेल पत्ता) ग्रहण करत नाही (स्वतःकडे ठेवत नाही). हे पोर्टल तुमच्या भेटीच्या वेळा आणि सांख्यिकी हेतूसाठी पुढील माहिती जसे की, इंटरनेट प्रोटोकॉल (आयपी) अ‍ॅड्रेसेस, डोमेनचे नाव, ब्राउजरचा प्रकार, ऑपरेटिंग सिस्टिम, भेट देण्याची तारीख व वेळ, भेट दिलेली पृष्ठे यांची नोंद (लॉग्स) ठेवते. आमच्या संकेतस्थळाची हानी करण्याचा प्रयत्न आढळून आल्याखेरीज आम्ही हे अ‍ॅड्रेसेस आमच्या संकेतस्थळाला भेट देणाऱ्या व्यक्तींच्या ओळखीशी जोडण्याचा प्रयत्न करत नाही. जेव्हा कायदा अंमलबजावणी करणाऱ्या संस्थेने सेवा पुरवठादारांच्या नोंदी (लॉग्स) तपासण्यासाठी वॉरंट जारी केले असेल अशा परिस्थितीचा अपवाद वगळता आम्ही वापरकर्ते किंवा त्यांच्या ब्राउजिंग क्रियांचा शोध घेत नाही. जर मऔविम तुमची वैयक्तिक माहिती पुरवण्यासाठी तुम्हाला विनंती करत असेल आणि तुम्ही ती देण्याचा पर्याय निवडलात तर ती कशासाठी वापरण्यात येणार आहे याविषयी तुम्हाला सूचित केले जाईल आणि तुमची खाजगी माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी योग्य त्या उपाययोजना अंमलात आणल्या जातील.

कॉपीराईट धोरण

या संकेतस्थळावरी माहिती निःशुल्कपणे कुठल्याही स्वरुपात किंवा माध्यमात, कुठलीही विशिष्ट परवानगी न घेता पुनर्मुद्रित करता येईल. माहिती जशी आहे तशी तंतोतंत वापरण्यात यावी आणि अप्रतिष्ठाकारक पद्धतीने अथवा दिशाभूल करण्याच्या संदर्भात वापरता येणार नाही. जेव्हा या सामग्रीचे प्रकाशन केले जाईल किंवा इतरांना दिली जाईल, त्या वेळेस हा स्त्रोत प्रामुख्याने अभिस्वीकृत केला गेला पाहिजे. तथापि, या सामग्रीचे पुनर्मुद्रण करण्याची अनुमतीमध्ये या संकेत स्थळावरील अशा माहितीचा विस्तार करू शकता नाही जे त्रयस्थ पक्षाचे सर्वाधिकार (थर्ड पार्टी कॉपीराईट) म्हणून ओळखले जाते. या प्रकारच्या माहितीचे पुनर्मुद्रण करण्याच्या अधिकारासाठी संबंधित सर्वाधिकार धोरण धारकाशी संपर्क साधावा.