राज्य राष्ट्रीय सकल उत्पादनात वाटा / जीएसडीपी (%): २५.७% (२०११-१२ व २०१८-१९ या कालावधीतील सरासरी)
विकास दर (%): ७% (२०१८-१९)
भारताच्या निर्यातीत वाटा (%): २०%*
मऔविमचा सहभाग: रु. १८,००० कोटींची गुंतवणूक करून राज्यामध्ये ३७ सार्वजनिक माहिती तंत्रज्ञान उद्याने (आयटी पार्क्स) विकसित केली व २.६८ लक्ष रोजगारांची निर्मिती केली
इतर
२०१५-२० या कालावधीत रु. ६७,८७२ कोटींची गुंतवणूक आकर्षित केली
२०१५-२० या कालावधीत ८.६५ लक्ष नवीन रोजगार संधी निर्माण केल्या
जुलै २०१७- मार्च २०२० या कालावधीत आयटी/ आयटीइएस कडून रु. ७,६४३ कोटींचा राज्य वस्तू व सेवाकर जमा करण्यात आला.
उपयुक्त परिसंस्था
मुंबई-पुणे नॉलेज कॉरीडॉर हे देशातील वेगाने वाढणारे आयटी केंद्र आहे.
राज्यातील सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅडव्हान्स कॉम्प्युटिंग (सी-डॅक) व इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे (आयआयटी-बी) या भारतातील मोठ्या नामांकित संस्था आहेत.
२०१५-२० या कालावधीत ४९,६३० नवीन आयटी/ आयटीइएस युनिट्सची स्थापना झाली.