व्यवसाय सुलभता (ईओडीबी) उपक्रमा अंतर्गत सुधारीत कृती आराखड्यांच्या अंमलबजावणीच्या आधारे उद्योग संवर्धन आणि अंतर्गत व्यापार विभागाद्वारे (डीपीआयआयटी) सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांचे मूल्यांकन केले जाते. राज्यांमध्ये स्पर्धेला प्रोत्साहन देणे व राज्यातील एकंदर व्यावसायिक वातावरणात सुधारणा करणे हा या उपक्रमाचा हेतू आहे.
व्यवसाय सुलभतेच्या माध्यमातून वरील उपक्रम सुलभरित्या राबविण्यामध्ये महाराष्ट्र देशातील अग्रगण्य राज्य आहे.
महाराष्ट्रामध्ये व्यवसाय सुरु करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या मंजुरींची विस्तृत माहिती गुंतवणूकदारांना सुलभरित्या उपलब्ध व्हावी या हेतूने हे पोर्टल निर्माण करण्यात आले आहे. यात मंजुरी/ परवानग्या/ निपटारा याविषयी महत्त्वाचे तपशील उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यात मंजुरी अधिकारी, आवश्यक अर्ज, आवश्यक दस्तऐवज, शुल्क व ते भरण्याच्या पद्धती, संपर्काचे तपशील आणि वेळमर्यादा इत्यादी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
मऔवि महामंडळाविषयी माहिती
संचालक मंडळ
मऔवि महामंडळाचे विभाग
कर्मचाऱ्यांचे पदनाम व त्यांचे कार्यभार अनुक्रमणिका
कर्मचाऱ्यांचे पदनाम व त्यांचे कार्यभार माहितीचा अधिकार
कर्मचाऱ्यांच्या स्थानाचे (पोझिशन) तपशील
उद्योग उभारण्यासाठी व तो चालवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या विविध प्रक्रिया व मंजुरींना सुव्यवस्थित करून त्याद्वारे महाराष्ट्रात व्यवसाय सुलभतेला चालना देण्याच्या वचनबद्धतेसह महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाद्वारे (एमआयडीसी) उद्योग व उद्योजकांसाठी एक खिडकी मंजुरी यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
ही यंत्रणा विविध सेवांसाठी विनंती, दस्तऐवज सादर करणे, ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करणे अशा गोष्टींसाठी एकल संपर्ककेंद्र म्हणून कार्य करते. यामुळे विभागांना प्राप्त अर्जांवर ऑनलाईन प्रक्रिया करण्याची यंत्रणा उपलब्ध आहे.
मऔवि महामंडळाची नागरिकांची सनद मानक, दर्जा व सेवा उपलब्ध करून देण्याची वेळमर्यादा यांविषयीची संस्थेची बांधीलकी, तक्रार निवारण यंत्रणा, पारदर्शकता व उत्तरदायित्व दर्शवते. नागरिकांना सार्वजनिक सेवा प्राप्त करण्यासंबंधी सामर्थ्य प्रदान करणे हा नागरिकांच्या सनदेचा मूळ उद्देश आहे. नागरिकांच्या सनदेची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी मऔवि महामंडळाने नोडल अधिकारी नियुक्त केले आहेत.
सुधारित विकास नियंत्रण नियमावली - २००९
माहिती तंत्रज्ञान/ जैव तंत्रज्ञान उद्यानांसाठी विकास नियंत्रण अधिनियम नियमात (डीसीआर रूल) सुधारणा
विकास नियंत्रण नियमावलीची अंमलबजावणी... कार्यालयीन आदेश
औद्योगिक नगरींसाठी अधिनियम व नियमने
अग्निशमन विभाग भरती नियम २०१३
सन १९६२ चा महाराष्ट्र अधिनियम क्र. ३, महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१
एकात्मिक औद्योगिक क्षेत्र विकास नियंत्रण नियमावली (IIA डीसीआर)
अंशदायी भविष्य निर्वाह निधीबाबत नियम
मऔवि महामंडळचे सेवा नियम